1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. plane crashes at Miami airport in America

मियामी विमानतळावर अपघात! लँडिंग करताना विमान घसरलं; 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील मियामी विमानतळावर ॲमेझॉनचे एक मालवाहू विमान कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टी ओलांडून जवळच्या वाहनांवर आदळले. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अपघात झाला आहे. ॲमेझॉनचे एक मालवाहू विमान धावपट्टी ओलांडून वाहनांवर आदळले. अपघातानंतर विमानाला आग लागली, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले. काही लोक बराच वेळ वाहनांमध्ये अडकले होते, तसेच पायलट आणि को-पायलटही विमानात अडकले होते, ज्यांना बचाव पथकाने बाहेर काढले. अपघातानंतर, मियामी-डेड फायर रेस्क्यूची ६० हून अधिक पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्युर्टो रिकोच्या सॅन जुआन येथून आलेले ॲमेझॉनचे एक मालवाहू विमान धावपट्टी ओलांडून गेले. विमानाची अनेक वाहनांशी टक्कर झाली आणि त्याला आग लागली, ज्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका व्यस्त विमानतळावर मालवाहू विमान उतरत असताना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: परीक्षेतील गोंधळामुळे पुण्यात Gen-Z रस्त्यावर! जंतर-मंतरसारख्या आंदोलनाने पुणे हादरले