1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
  4. Healthy Walnut Milk Coffee Recipe

नेहमीच्या कॉफीऐवजी आरोग्यदायी वॉलनट मिल्क कॉफी रेसिपी नक्की ट्राय करा

Walnut Milk Coffee
जर तुम्हाला सकाळी काहीतरी आरोग्यदायी प्यायला आवडत असेल, तर या वेळी अक्रोड दुधाची कॉफी करून पहा. ही बनवायला खूप सोपी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, याचे अनेक फायदे आहे. तर चला जाणून घेऊ या रेसिपी...
 
साहित्य-
अक्रोड दूध - १ कप
इन्स्टंट कॉफी - १/२ चमचा
मध किंवा मेपल सिरप - १/२ चमचा
दालचिनी पूड - चिमूटभर
 
कृती-
सर्वात आधी अक्रोड दूध एका पातेल्यात ओता आणि मंद आचेवर २-३ मिनिटे गरम करा. त्याला उकळी आणण्याची गरज नाही. आता, एका कपात इन्स्टंट कॉफी ओता आणि त्यात २ मोठे चमचे गरम पाणी घालून चांगले ढवळा. गरम अक्रोड दूध कॉफीच्या कपात ओता आणि व्यवस्थित मिसळा. जर तुम्हाला हलका गोडवा हवा असेल, तर मध किंवा मेपल सिरप घाला. तुम्ही वरून थोडी दालचिनी पूड भुरभुरवू शकता. तुमची आरोग्यदायी अक्रोड दुधाची कॉफी तयार आहे. तुम्ही ते गरमागरम देऊ शकता, नाहीतर थंड करून फ्रिजमध्ये ठेवा आणि थोड्या वेळाने प्या. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा