संबंधित माहिती
- ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन
- पंतप्रधान म्हणाले, 'महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है'
- कोरोना व्हायरस : आपण हॉटेलमध्ये जात असल्यास ही नियमावली जाणून घ्या
- कोरोना काळात आपली संपत्ती कशी वाढवता येईल, योग्य गुंतवणूक कुठे करावी जाणून घ्या
- राज्यात २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले
एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्या लोकांना देखील स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे.
ट्विट करत ते म्हणाले की, 'मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...'
