खमंग अशी जवस-तिळाची चटणी; लिहून घ्या रेसिपी
साहित्य-
जवस- अर्धी वाटी
तीळ - अर्धी वाटी
लसूण- सहा पाकळ्या
लाल तिखट- अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल- एक टीस्पून
कृती-
सर्वात आधी एका कढईत मंद आचेवर एक टीस्पून तेल गरम करा. त्यात जवस आणि तीळ घालून हलक्या हाताने परतून घ्या. दोन्ही साहित्य खमंग सुगंध येईपर्यंत आणि हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. व थंड होऊ द्या. जर लसूण वापरत असाल, तर त्याच कढईत लसणाच्या पाकळ्या हलक्या तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. व थंड होऊ द्या. थंड झालेले जवस, तीळ आणि लसूण मिक्सरमध्ये घाला. त्यात लाल तिखट आणि मीठ घालून बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्या किंवा जाडसर देखील वाटू शकतात. तयार चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा. चला तयार आहे आपली खमंग चटणी रेसिपी, भाकरी, पराठा सोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik