बजेटमध्ये मिळू शकते नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठी सवलत
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठी सवलत देऊ शकतात, असं स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांति घोष यांचं म्हणणं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या इकोरॅप अहवालात असा दावा करण्यात आला आहे.
या अहवालात असं म्हटलं आहे की, आयकरच्या कलम 80 क नुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या जमा/गुंतवणुकीवर सूट देण्यात आली आहे. पण ही मर्यादा देखील दोन लाख करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. या अहवालात अशीही शिफारस करण्यात आली आहे की, गृहकर्जावरील व्याजदराची रक्कम दोन लाख रुपयांवरुन अडीच लाख करण्यात यावी. यामुळे गृह कर्ज घेणाऱ्या जवळजवळ 75 लाख लोकांना याचा फायदा मिळेल.
