४ बळी अन् २० दिवसांचा थरार! नरभक्षक वाघिणीला पकडण्यात आले, पण उपचारादरम्यान मृत्यू
अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत दहशत माजवणारी नरभक्षक वाघीण अखेर वन विभागाकडून जेरबंद करण्यात आली, मात्र नागपूर येथील बचाव केंद्रात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. या वाघिणीने गेल्या २० दिवसांत ४ जणांचा बळी घेतला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण होते.
वन विभागाच्या विशेष पथकाने सोमवारी महाराष्ट्रातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध केले. या वाघिणीने १७ ऑगस्टपासून चार जणांचा बळी घेतला होता. तिला चांदूर बाजार तालुक्यातील शिरजागाव शहरात पकडण्यात आले. अमरावतीचे उपवनसंरक्षक यांनी सांगितले की, ही वाघीण वर्ध्यातील आष्टी तालुक्यातून निघून गेल्या २० दिवसांपासून वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यात पोहोचली होती आणि पाळीव प्राणी व लोकांवर हल्ले करत होती
तसेच नागरिकांच्या तीव्र संतापानंतर वन विभागाने चोवीस तास गस्त, थर्मल ड्रोन, आणि कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने मोठी मोहीम राबवली. अखेर ७ सप्टेंबर रोजी चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि अमरावती येथील संयुक्त पथकाने तिला ट्रँक्विलाइज (बेशुद्ध) करून जेरबंद केले. वाघिणीला पिंजऱ्यात टाकून उपचारासाठी नागपूरला हलवले जात होते. प्रवासादरम्यान मोर्शीजवळ तिची प्रकृती अचानक बिघडली आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, तरीही तिने प्राण सोडले.
प्राथमिक अंदाजानुसार, जेरबंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान वाघिणीवर अतिताण आल्यामुळे किंवा ती आधीपासूनच आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
Edited By- Dhanashri Naik