SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये 'पुष्पा २: द रुल' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
'पुष्पा' फ्रँचायझीमध्ये 'पुष्पा राज' ही व्यक्तिरेखा साकारून त्याने मनोरंजनाच्या जगात एक नवा इतिहास रचला आहे. त्याच्या जबरदस्त अभिनयामुळेच त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. गेल्या काही वर्षांत अल्लू अर्जुनला त्याच्या अभिनयाबद्दल समीक्षकांनी केवळ कौतुक केले नाही तर त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या कामगिरीत आणखी एक यश मिळवत, अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
'पुष्पा राज' या व्यक्तिरेखेतील उत्कृष्ट अभिनयाने अल्लू अर्जुनने सर्वांचे मन जिंकले आहे. रश्मिका मंदान्नासोबतची त्याची केमिस्ट्री आणि दमदार फाईट सीक्वेन्सना खूप कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला आहे.
आता, चाहते त्याला फ्रँचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या चित्रपटात 'पुष्पा राज' म्हणून परतताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
Edited By- Dhanashri Naik