शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2025 (12:43 IST)

Makar Sankranti पवित्र पर्वावर देशातील या पाच शहरांना भेट द्या

Kite festival
India Tourism : मकर संक्रांत हा भारतातील सर्वात पवित्र सणांपैकी एक आहे. तसेच हा वर्षातील पहिला सण आहे, जो जानेवारी महिन्यात येतो. हा सण कापणी आणि सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतात कापणीचे सण वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जातात, ज्यात लोहरी आणि पोंगल यांचा देखील सहभाग आहे. तसेच देशातील या पाच शहरांमध्ये मकरसंक्रांती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तुम्ही देखील संक्रांतीच्या या पवित्र पर्वात या शहरांना नक्की भेट द्या. चला तर मग जाणून घेऊ या शहरांबद्दल जिथे मकरसंक्रांती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

अहमदाबाद-
गुजरातची राजधानी अहमदाबाद ही देशभरात पतंग महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तसेच या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पतंग उडवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मकरसंक्रांतीच्या काळात अहमदाबादचे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी सुंदर दिसते. मकर संक्रांतीला येथील वेगवगेळे पदार्थदेखील चाखले जातात.

जयपूर-
राजस्थानची राजधानी जयपूर येथेही मकर संक्रांतीला एक अद्भुत कार्यक्रम आयोजित केला जातो. जयपूरमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. या शहरात विविध रंगीत कार्यक्रम होतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथे अनेक मेळे देखील भरवले जातात.

मुंबई-
महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मकर संक्रांतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच पहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात मकरसंक्रांती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रात मकरसंक्रांतीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच मुंबईत हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, येथील लोक विशेषतः तीळ गूळ आणि मकर संक्रांतीच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. महाराष्ट्रातही पतंग उडवले जातात, शहराचे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते.

वाराणसी-
वाराणसीमध्ये मकर संक्रांतीचा सण पवित्रता आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. तसेच लोक येथील घाटांवर स्नान करतात आणि सूर्याची प्रार्थना करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काशीमध्ये विविध धार्मिक विधी होतात आणि भाविक गंगा नदीत स्नान करतात. तुम्ही मकर संक्रांती साजरी करण्यासाठी येथे देखील जाऊ शकता.
तामिळनाडू-
दक्षिण भारतात असलेल्या तामिळनाडू देखील मकरसंक्रांती साजरी केली जाते. येथील विविध मंदिरांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मीनाक्षी मंदिर हे येथील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे.