1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 मे 2025 (07:30 IST)

Valley of Flowers Uttarakhand येथे अनेक प्रकारची फुले उमलतात

Flowers Uttarakhand
India Tourism : भारतात अनेक पर्यटन स्थळे आहे. अनेक पर्यटक या स्थळांना भेट देत असतात. अनेकांना फिरायला आवडते. याकरिता नवीन नवीन पर्यटनस्थळे ते शोधत असतात. तुम्ही देखील असेच काहीसे नवीन पर्यटनस्थळे शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत जे स्वर्गापेक्षा कमी नाही. ते पर्यटनस्थळ म्हणजे उत्तराखंडमधील फुलांची दरी होय. हे ठिकाण विविध प्रकारच्या फुलांनी भरलेली असते.  
फुले ही निसर्गाच्या सर्वात सुंदर देणग्यांपैकी एक आहे. उत्तराखंडच्या गढवाल भागात फुलांची दरी आहे जिथे विविध प्रकारची फुले तुमचे मन मोहून टाकतील. ही फुले इतकी सुंदर आणि आकर्षक दिसतात की तुम्ही या फुलांच्या दरीचे चाहते व्हाल. जर तुम्हाला इथे जायचे असेल तर जून महिना सर्वोत्तम आहे.  
 
व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये गेल्यावर तुम्हाला स्वर्गात असल्यासारखे वाटेल. येथे पोहोचण्यासाठी एका ट्रॅकवरून चालावे लागते, जो जगातील सर्वात सुंदर ट्रेकपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक ही दरी पाहण्यासाठी येतात. तुम्ही १ जून ते ३० ऑक्टोबर पर्यंत कधीही जाऊ शकता. पण जुलै ते ऑगस्ट हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वात सुंदर असतो. यावेळी हलक्या पावसामुळे हवामान आल्हाददायक होते. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचाही समावेश आहे. येथे तुम्हाला ५०० हून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतील. येथे काही प्रकारच्या फुलांचे दर्शन घडते जे फक्त याच दरीत दिसून येते. जसे उत्तराखंडचे राज्य फूल असलेले ब्रह्मकमळ फक्त येथेच दिसते.
व्हॅली ऑफ उत्तराखंड जावे कसे? 
व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाण्यासाठी ऋषिकेशहून जावे लागते.  सर्वात जवळचा परिसर जोशीमठ जवळील गोविंदघाट आहे, जो १७ किमी अंतरावर आहे. तुम्ही ट्रेकिंगद्वारे येथे पोहोचू शकता. तसेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्यासाठी पर्यटकांना गंगारिया येथून परवाना घ्यावा लागतो. हा परवाना ३ दिवसांसाठी वैध आहे आणि तुम्ही येथे फक्त दिवसा ट्रेक करू शकता.