संबंधित माहिती
- स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री
- दे रे दे माय, असं सरकारचं वागणं म्हणजे पोरखेळ – आ. अजित पवार
- अमेझान, फ्लिपकार्टप्रमाणे आता सरकारी वेबसाइटवरून देखील करू शकाल शॉपिंग
- सरकार आल्यावर तात्काळ कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार – अजित पवार
- सरकार कुठल्या तोंडाने जनतेकडे मतं मागायला येते? – अजित पवार
सुप्रिया सुळेंचं सरकारला चॅलेंज
देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी सरकारला आवाहन दिलं आहे. माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा, असं खुलं आवाहन सुप्रिया सुळेंनी सोलापुरात दिलं.
मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ट्रॅकवर आणण्यासाठी सीतारमण यांच्या अनेक घोषणा
सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.
मी काही केलंच नाही तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.