जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर संप्रदायात भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व येते. त्यांचे हे पर्व आठ दिवस चालते. त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे लोक हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ते दसलक्षण या नावाने संबोधतात. ...