महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; नाशिक, पालघर, रायगड, मुंबईत सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक २०३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त, ठाण्यात ११६.४ मिमी, रायगडमध्ये १०८.७ मिमी, मुंबई उपनगरात ९०.४ मिमी आणि पुण्यात ७०.९ मिमी पावसाची नोंद झाली.
सततच्या पावसामुळे कोकण भागातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा, सावित्री आणि जगबुडी नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, तर कुंडलिका आणि पिंजल नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
साताऱ्यात भूस्खलन
सातारा जिल्ह्यात भूस्खलनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून चार जनावरेही मरण पावली. नंदुरबारमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ठाणे आणि मुंबई शहरात झाडे कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एक व्यक्ती जखमी झाली. पालघरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ११ जनावरे मरण पावली.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये भरतीचा इशारा
INCOISने ८ जुलैच्या रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, ४.८ ते ५ मीटर उंचीच्या लाटा येऊ शकतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असून, ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघरच्या किनारपट्टीवरही समुद्र अत्यंत खवळलेला राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लहान बोटी आणि मासेमारीच्या जहाजांना समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला दिला आहे.
तसेच हवामान विभागाने नाशिक आणि पालघरसाठी इशारा जारी केला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर विदर्भाच्या अनेक भागांसाठी यलो अलर्ट लागू आहे.
Edited By- Dhanashri Naik