संबंधित माहिती
- LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा
- वर्धा मधील माजरीतील पाटला येथे नदीत एमएसएफ जवानाचा बुडून मृत्यू
- शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले
- SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन
- SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले
मनोज जरांगे पाटलांचा ३० मे पासून रखरखत्या उन्हात बेमुदत उपोषणाचा इशारा!
Manoj Jarange Patil Hunger Strike मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ३० मे पासून ते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे तीव्र बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे, यंदाचे उपोषण कोणत्याही मंडपाशिवाय, मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात, अनवाणी पायाने आणि अन्न-पाण्याचा त्याग करून केले जाईल, असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
सरकारला दिला अल्टिमेटम: काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, मात्र त्यानंतरही शासनाकडून आरक्षणाबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी आता 'आरपारची लढाई' लढण्याची घोषणा केली आहे.
उष्माघाताने बळी गेल्यास सरकार जबाबदार: मे महिन्याच्या कडक उन्हात सावलीशिवाय उपोषणाला बसणार असल्याचे सांगत, "माझ्या समाजाच्या मुलांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला असताना मी स्वतःची काळजी का करू?" असा सवाल त्यांनी केला. या आंदोलनादरम्यान उष्माघातामुळे प्राणाचे बरे-वाईट झाल्यास त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
समाजबांधवांना आवाहन: आंदोलनाची तीव्रता पाहता, मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील नागरिकांना अंतरवाली सराटी येथे गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
शासनावरील रोष: शांततेत मोर्चे काढून आणि वेळ देऊनही सरकार प्रश्न सोडवत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यभरातील मराठा तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे न घेणे, बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबांना नोकरी न मिळणे आणि कुणबी प्रमाणपत्र असूनही सवलती न मिळणे यांवरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच श्रीमंती किंवा फळबागा असणे हा आरक्षणाचा निकष असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या मुद्द्यांना खोडून काढले.
