संबंधित माहिती
- SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार
- RCB vs GT : क्वालिफायर १ मध्ये गुजरातला हरवून आरसीबी पाचव्यांदा आयपीएल फायनलमध्ये दाखल
- RCB vs GT : आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे
- GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे
- दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला
SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले
वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या आणि जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४७ धावांनी विजय मिळवला. रॉयल्सने दिलेल्या २४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा संघ आर्चर (३/५८), सुशांत मिश्रा (२/२१), रवींद्र जडेजा (२/२१) आणि नांद्रे बर्गर (२/२६) यांच्या गोलंदाजीवर १९.२ षटकांत १९६ धावांवर सर्वबाद झाला.
नितीश कुमार रेड्डीने संघासाठी सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर सलील अरोरा (३५) आणि इशान किशन (३३) यांनीही उपयुक्त खेळी केली, परंतु संघ लक्ष्य गाठण्याच्या स्थितीत कधीच दिसला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी, रॉयल्स संघ आता शुक्रवारी येथे दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सामना करेल.
Edited By- Dhanashri Naik
