1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. asaduddin owaisi

ओवेसीच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्र. 19 मधील एमआयएमचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी ओवेसी पुण्यात भवानी पेठ भागात रॅली काढणार होते. मात्र ओवेसी यांची भाषणे प्रक्षोभक आणि जातीयवादी असतात, शिवाय त्यांच्या जीवालाही धोका आहे. या कारणांमुळे हा परिसर त्यांच्या रॅलीसाठी अयोग्य असल्याचे सांगत, खडक पोलीस ठाण्याने रॅलीला परवानगी नाकारली आहे.
पुढील लेख
रिलायन्स जिओमुळे आयडियाला फटका