1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Best Rose Day recipe Rose Panna Cotta

Rose Day Recipe जोडीदाराला द्या सरप्राईज, नक्की ट्राय करा रोझ पन्ना कोट्टा

रोझ डे दिवशी जर तुम्हाला काहीतरी 'रॉयल' आणि इटालियन डिश बनवायची असेल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
साहित्य-
१ कप फ्रेश क्रीम
१/२ कप दूध
४ चमचे साखर
१ चमचा जिलेटीन 
२ चमचे रोज वॉटर किंवा रोज सिरप 
 
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात क्रीम, दूध आणि साखर एकत्र करून गरम करा. दुसऱ्या बाजूला जिलेटीन कोमट पाण्यात विरघळून घ्या आणि क्रीमच्या मिश्रणात मिसळा. शेवटी त्यात रोज सिरप घालून नीट ढवळा. हे मिश्रण काचेच्या मोल्डमध्ये ओतून ४-५ तास फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा. वाढताना वरून गुलाबाच्या पाकळ्या टाका. या रेसिपीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यास स्वाद अधिक नैसर्गिक आणि छान येतो.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik