संबंधित माहिती
- महाराष्ट्र जीवघेण्या पावसामुळे हादरले
- महाराष्ट्रात पावसाचे थैमान, रायगडमध्ये दरड कोसळून 5 ठार, 30 अद्याप बेपत्ता
- महाराष्ट्र पाऊस : पोलादपुरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू, 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
- नाशिकला जोरदार पावसाने झोडपले;२४ तासात गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत १३ टक्के वाढ
- राज्यभरात पावसाचे थैमान, रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा तडाखा
का कोपला रे वरुण राजा, तुझ्या लेकरावरी
का कोपला रे वरुण राजा, तुझ्या लेकरावरी,
त्राहीमाम जाहले रे, अवघ्या पामरावरी,
हाहाकार उडला, झाले जलमय गावं,
रस्ता दिस न कुठं, न कशाला उरला वाव,
जीव मुठीत घेऊन सारे, कसेबसे आहेत उभे,
वाहून गेले घरकुल इवले,सांग काय करावे?
दशा मानवाची झालीया दारुण आता, न उरला थारा,
थांबव ना रे आता तरी, मिळू दे ना सहारा!
दैना आता जरा थांबव, घे जरा विश्रांती तू ही!
वाचवा या त्या जीवांना, दे सद्बुद्धी तू सकलना ही !
....अश्विनी थत्ते
पुढील लेख
