संबंधित माहिती
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलला अटक
- एका दिवसात किती बदाम खावेत? बदाम खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या
- त्याला ठार मार, मी जमीन देईन, मणिपूरच्या बीजेपी प्रवक्त्याला जीवे मारण्याची धमकी
- बेंगळुरूमध्ये डॉक्टरांनी मुलीच्या पोटातून बॉलच्या आकाराच्या केसांचा गुच्छ बाहेर काढला
- आरजी कार मेडिकल प्रकरणातदोन सुरक्षा रक्षकांची पॉलिग्राफ चाचणी केली
देवाचे घर
इवल्या इवल्याश्या, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोगरात निळी निळी दरी
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
कवी-ग. दि. माडगूळकर
