संबंधित माहिती
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना सूचना
- जळगावात दहशत माजविणारा गुन्हेगाराला अटक
- बांगर, राजेश नार्वेकर यांच्यासह १२ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
- मुख्याध्यापकाला एक हजारांची लाच घेताच एसीबीने ठोकल्या बेड्या
- आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा-उद्धव ठाकरें
तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट
facebook
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. या तपासात आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणा आणि पोलीस आयुक्तांना दिली. हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि अज्ञात व्यक्तीचा होत असलेला वावर याबाबत सखोल तपास तपास करावा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु याबाबत पोलिसांनी आजवर सखोल तपास केल्याचं दिसत नाही. या प्रकरणी हायकोर्टात रिट पीटीशन करून तपास यंत्रणेकडून तपास काढून दुसऱ्या यंत्रणांकडे हा तपास द्यावा अशी दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
तर माझ्या मुलाच्या हत्येनंतर राज्याचे गृहमंत्री, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली बेजबाबदार विधाने मूळ प्रश्नापासून वळवण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहेत. मुलाच्या हत्येनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वधर्मीयांनी प्रत्यक्ष भेटून आमच्या परिवाराचे सांत्वन केले. मात्र गृहमंत्री यांनी विधान परिषद सभागृहात केलेले निवेदन राजकीय असून मनाला वेदना देणारे आहे. त्यामुळे तपासाची दिशाही बदलली असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला.
Edited By -Ratnadeep Ranshoor
