1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. masood-azhar-in-pakistan

मसूद अजहरचा एयरस्ट्राइकमध्ये मृत्यू झाला की हे इम्रान खानचे नवीन षड्यंत्र आहे?

कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेला मसूद अझहर याचा पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे मृत्यू झाला आहे.
 
मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अजून मिळाली नसून खाजगी वृत्तवाहिनच्या वृत्तानुसार  मसूद अझहरचा 2 मार्च रोजीच (शनिवारी) मृत्यू झाला. त्याला आजाराने ग्रासलं आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते. पाकिस्तान सरकारनं याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही.
पुढील लेख
धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की “त्या’ शिवसेना नगरसेवकांना अटक करा