1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. rape of wife in front of husband on sonipat highway

चाकू दाखवून नवर्‍यासमोर पत्नीसोबत दुष्कर्म

rape of wife in front of husband on sonipat highway
बाइक स्वार तरुणांनी चाकू दाखवून नवर्‍यासमोरच महिलेसोबत दुष्कर्म केले आणि पैसे व मोबाइल घेऊन पळून गेले. ही घटना सोनीपत-झज्जर नॅशनल हाईवेवर शनिवार रात्री घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध प्रकरण दाखल केले आहे. 
 
रोहतक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलेचं मेडिकल करवले गेले. पोलिसांनी शंकेच्या आधारवर तरुणाला अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
 
महिलेच्या नवर्‍याने तक्रार केली की तो सोनीपत जिल्ह्यातील एका वस्तीमध्ये राहतो. शनिवारी तो सांपलाहून आपल्या पत्नीसह बाइकवर जात होते. नॅशनल हाईवे नंबर 334 वर हसनगढजवळ बुलेट स्वार तीन तरुणांनी त्यांना थांबवले आणि गळ्यावर चाकू ठेवून पत्नीला काही दूर घेऊन गेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला.
 
जाताना बदमाश त्याकडून सात हजार रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाले. त्यातून एक आरोपीचं नाव सागर असे सांगण्यात आले आहे. बाइकचा नंबर देखील पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत सागर आणि दो अज्ञात तरुणांविरुद्ध प्रकरण दाखल केले आहे.
पुढील लेख
नवर्‍याच्या पासपोर्टची बनवली फोन डायरी, व्हिसा लावत असलेल्या जागेवर लिहिले मोबाइल नंबर