1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Child Thrown into Blazing Tandoor by Enraged Caterer for Eating Rasgullas Without Permission

न विचारता रसगुल्ले खाल्ल्यामुळे केटररने मुलाला धगधगत्या तंदूरमध्ये फेकले

न विचारता रसगुल्ले खाल्ल्यामुळे केटररने मुलाला धगधगत्या तंदूरमध्ये फेकले
लग्नसमारंभात उत्साहाचे वातावरण आणि दुसर्‍या बाजूला जळून खाक झालेले एक मूल कारण काय तर रसगुल्ला. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एक लग्नसमारंभ सुरू होता. त्याच समारंभात एका मुलाला तंदूरमध्ये फेकण्यात आले. कारण असे होते की, त्याने न विचारता रसगुल्ले खाल्ले. यामुळे केटरर इतका संतापला की त्याने त्या ११ वर्षांच्या मुलाला धगधगत्या तंदूरमध्ये फेकून दिले.
 
ही संपूर्ण घटना १५ एप्रिल रोजी घडली. त्या दिवशी, गोंडा भागातील रहिवासी संतोष यांचा मुलगा चमन एका लग्नसमारंभाला गेला होता. आईच्या निधनानंतर तो बस्ती येथील आपल्या आजीच्या घरी राहत होता. १५ एप्रिल रोजी चमन आपल्या आजीसोबत गावातील एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्नसमारंभादरम्यान तो जेवणाच्या ठिकाणी गेला आणि रसगुल्ले खाऊ लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलाने वारंवार रसगुल्ले खाल्ले तेव्हा केटरिंग कंत्राटदाराला राग आला. त्याने आधी मुलाला पकडून धमकावले, नंतर त्याला उचलून पेटत्या तंदूरकडे नेले. यावेळी मुलाचा तोल गेला आणि तो तंदूरमध्ये पडला.
 
मुलाचा आक्रोश ऐकून, लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला तंदूरमधून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा चेहरा ते कंबर गंभीररीत्या भाजली होती. चमनला उपचारासाठी तात्काळ अयोध्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. दरम्यान आरोपी केटरिंग कर्मचारी घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच, पोलीस गावात दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. मुलाचे मामा, देविदिन निशाद यांनी तंदूर कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमांची तीव्रता पाहता मुलाला लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: नितीन राऊत यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली