ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री अंजूला अटक
चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री अंजू कृष्णा हिला ड्रग्ज बाळगणे आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, अँटी-नार्कोटिक्स इंटेलिजेंस युनिट (ANIU) ने सहाय्यक दिग्दर्शक अंजू आणि इतर सहा जणांना ताब्यात घेतले. या अटकेमुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक जॉनी चेल्लाप्पा यांनी संशयावरून नेसापक्कम येथील रहिवासी विघ्नेश्वरनला अटक केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. चौकशीदरम्यान त्याने व्यंकटेश कुमार नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले. पोलिसांनी व्यंकटेशला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. एका पोलिस अधिकाऱ्याने "बनावट ग्राहक" असल्याचे भासवले आणि ड्रग्जच्या व्यवहारासाठी व्यंकटेशकडे संपर्क साधला. व्यंकटेश त्याच्या गाडीत येताच पोलिसांनी त्याला घेरले आणि झडती दरम्यान त्याच्या गाडीतून बंदी घातलेले ड्रग्ज जप्त केले.
व्यंकटेशची कठोर चौकशी केली असता, त्याने या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेल्या इतर लोकांची नावे उघड केली. तमिळ अभिनेत्री अंजू कृष्णा आणि सहाय्यक दिग्दर्शक विन्सी निवेथा यांची नावे ऐकून पोलिसांना धक्का बसला. जलदगतीने कारवाई करत पोलिसांनी सर्व आठ आरोपींना अटक केली.
Edited By - Priya Dixit