संबंधित माहिती
- दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
- चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा
- सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला
- 'राजा शिवाजी'ने इतिहास रचला, १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा सर्वात वेगवान मराठी चित्रपट ठरला
- ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण
आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू (आर्ची) आणि आकाश ठोसर (परश्या) हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके कलाकार बनले. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना जेवढी आवडली, तेवढीच त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोही शेअर करत असतात.
नुकतेच रिंकूने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनीथिंग' (मला काहीही विचारा) हे सत्र घेतले, ज्यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. यातील तिची उत्तरे सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
चाहत्यांचे प्रश्न आणि रिंकूची उत्तरे:
एका युजरने तिला विचारले, "तू आणि आकाश रिलेशनशिपमध्ये आहात का?" त्यावर रिंकूने स्पष्ट केले, "नाही, आम्ही फक्त खूप चांगले मित्र आहोत."
जेव्हा एका चाहत्याने तिच्या लग्नाबद्दल विचारले, तेव्हा तिने मजेशीर अंदाजात हसण्याचा इमोजी टाकत उत्तर दिले, "चांगला विचार आहे."
"सैराट चित्रपटातून तुला किती पैसे मिळाले?" असा प्रश्न एका युजरने विचारला असता, पैशांचा आकडा न सांगता रिंकू म्हणाली, "सैराटने मला माझी ओळख दिली."
मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या सर्वोत्तम मैत्रिणीबद्दल विचारले असता तिने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये तिची कोणीच खास मैत्रीण नाही, पण खऱ्या आयुष्यात 'पूजा वरद' ही तिची सर्वात चांगली मैत्रीण आहे.
'सैराट' चित्रपटाला रिलीज होऊन आता बरीच वर्षे झाली असली, तरी आर्ची आणि परश्या यांच्या जोडीची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. नुकतेच हे दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते, जिथे त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी भरभरून पसंती दिली.
शिवाय एका यूजरने विचारले की तू आणि आकाश पुन्हा एकत्र काम केव्हा करणार? यावर रिंकूने म्हटले मी तयार आहे... आकाशला विचारायला हवं.
पुढील लेख
