1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Last Modified: गुरूवार, 21 मे 2026 (10:28 IST)

ठाण्यात भाजी मार्केटला आग: ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात लागलेल्या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक

ठाण्यात भाजी मार्केटला आग
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. 
 
या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे का नाही याची माहिती अजून समोर आलेली नाही. सुरुवातीला धुरामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आणि अफवा पसरली होती, परंतु प्रशासनाने आणि अग्निशामक दलाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणीही गंभीर जखमी किंवा मृत झालेले नाही.
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरातील जनता बाजार आणि सीकेपी हॉलच्या मागे पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग भीषण असल्यामुळे मार्केटमधील जवळपास ४० ते ४५ भाजी आणि फळांची दुकाने/स्टॉल्स जळून खाक झाले आहे. व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि जवानांनी तत्परतेने काम करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून सध्या कूलिंगचे काम सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik