मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Modified: मंगळवार, 2 डिसेंबर 2025 (17:46 IST)

Funny Anniversary wishes For Friends मित्रांसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Anniversary wishes For Friends
तुमच्या 'जन्मठेपेच्या' आणखी एका वर्षाची शिक्षा 
यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 
पुढच्या वर्षासाठी आतापासून सज्ज व्हा!
 
मित्रा, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे पापांचे घडे भरले की मृत्यू होतो,
त्याचप्रमाणे आनंदाचे घडे भरलेले की लग्नही होते! 
हा हा हा!!
 
अरे वेड्या, लग्नाला आणखी एक वर्ष पूर्ण! 
तुझी बायको अजूनही तुझ्यासोबत आहे याचं प्रमाणपत्र दाखव, पुरावा हवाय! 
Happy Anniversary!
 
बघ बघ, तू सुद्धा एक वर्ष टिकला! 
आता तुला नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे... 
“सर्वाधिक सहनशील पती” या कॅटेगरीत! 
 
तुमच्या दोघांचा 'तू-तू-मै-मै' चा सामना 
अजूनही ड्रॉ आहे! अभिनंदन! पुढच्या राऊंडसाठी ऑल द बेस्ट!
 
Happy Anniversary भावा! 
आता कळलं असेल ना, 
लग्न म्हणजे फेसबुक स्टेटस नाही की दरवर्षी “Single → Married → Complicated” असं बदलता येतं!
 
वैवाहिक जीवन काश्मीरसारखे आहे
 
ते सुंदर आहे, पण खूप दहशत आहे!
 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!
 
माझ्या प्रिय मित्रा! 
आजच्या दिवशी तरी रिमोट कंट्रोल तुझ्या हातात राहील, अशी आशा करतो! 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुझं लग्न पाहून मला फक्त एक गोष्ट कळली... 
तू आता फक्त दोनच गोष्टी म्हणतोस: “हो ” आणि “सॉरी ”! 
पुन्हा एक वर्ष बेस्ट ऑफ लक!
 
हा 'एकमेकांवर' केलेला सगळ्यात मोठा धोका होता, 
पण 'नुकसान' अजूनही मर्यादेत आहे! 
तुमच्या या 'गुंतवणुकीला' शुभेच्छा!
 
तुझं लग्न टिकलं एवढं वर्ष हे पाहून मला विश्वास बसत नाही... 
कारण लग्नापूर्वी तू म्हणायचास, 
“मी कधीच बायकोच्या मागे मागे फिरणार नाही”... 
आता तर फक्त तिच्याच मागे फिरतोस! 
Happy Anniversary!
 
तू आणि तुझी बायको दोघे मस्त जोडी आहात... 
एक “शांत” आणि दुसरा “शांत करणारा”! 
पुन्हा एक वर्ष सहन केल्याबद्दल धन्यवाद!
 
नवरा असा प्राणी असतो 
जो भुतांना घाबरत नाही, 
पण बायकोचे चार मिस्ड कॉल 
भीती निर्माण करण्यासाठी पुरेसे असतात!
Happy Anniversary!
 
अरे यार, 
तू इतकी वर्ष तिच्यासोबत राहिलास 
याचं सेलिब्रेशन करायचं की सिम्पथी द्यायची हे कळत नाही! 
दोन्ही करतो... Happy Anniversary!
 
तुझ्या लग्नाचा वार्षिक उत्सव! 
आता तू फक्त दोनच गोष्टी वापरतोस: एक “ATM कार्ड” आणि दुसरं “हो गं माझं चुकलं”! 
खूप खूप शुभेच्छा!
 
अविवाहित राहून आत्महत्या करण्यापेक्षा 
लग्न करुन तडफडत तडफडत वेदनेने मरण्यात एक वेगळाच आनंद आहे.
असं म्हणणार्‍या माझ्या मित्राला
Happy Anniversary!